
जुन्नर तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या जागांचा निकाल जाहीर
जुन्नर - जुन्नर तालुक्यातील (Junnar Tahsil) सात ग्रामपंचायतीच्या (Grampanchyat) सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची (Election) बुधवारी (ता. २२) मतमोजणी करून निकाल (Result) जाहीर करण्यात आला.
निमगिरी, पिंपळगावतर्फे नारायणगाव, आंबेगव्हाण, अहिनवेवाडी, खिलारवाडी, वाणेवाडी, भिवाडे खुर्द, बोतार्डे, काले, अलदरे, सोमतवाडी या ११ ग्रामपंचायतींसाठी एकही अर्ज आला नाही. त्यामुळे येथील पदे पुन्हा रिक्त राहिली आहेत. धालेवाडीतर्फे मिन्हेर ग्रामपंचायतीच्या रिक्त जागेसाठी दाखल केलेले अर्ज उमेदवारांनी माघारी घेतल्याने येथील जागा रिक्त राहीली आहे. आर्वी व हिवरे बुद्रुक येथील निवडणूक रद्द झाली आहे. तर, आठ ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने या जागा बिनविरोध झाल्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस व नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी जाहीर केले.
सात ग्रामपंचायतीमधील एकूण ७ जागांसाठी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या ग्रामपंचायतीमधील उमेदवार व त्यांना पडलेली मते कंसात पुढीलप्रमाणे -
गोळेगाव : पल्लवी वाणी-विजयी (१३०), अमृता लोखंडे (९७), शोभा माळी (७८), चित्रा कोकणे (६१), नोटा (१), एकूण मते ३६७.
बेलसर : महेंद्र मंडलिक-विजयी (१०८), मारुती मंडलिक (७८), नोटा (१), एकूण मते १८७.
गुळुंचवाडी : संदीप घोडके विजयी (२२६), बाबूराव जाधव (२३०), नोटा (४), एकूण मते ४६०.
पेमदरा : जयश्री गाडेकर (१२५), सचिन गोफणे (७५), नितीन वायदंडे (८), एकूण मते २०८.
बांगरवाडी : चंद्रकांत विचारे-विजयी (१९३), विशाल बांगर (१३४), नोटा (१०), एकूण मते ३३७.
वारूळवाडी : नारायण दुधाणे -विजयी (३९५), शशिकांत पारधी (३४१), नोटा (११), एकूण मते ७४७.
नारायणगाव : अक्षय वाव्हळ, विजयी (८३१), गिरिराज वाव्हळ (१७७), नोटा (१७) एकूण मते १०२५.
बिनविरोध ग्रामपंचायती व कंसात जागा पुढीलप्रमाणे : राळेगण (१), खोडद (१), हातविज (३), पांगरीतर्फे मढ (१), तांबेवाडी (१), आलमे (१), मांदारणे (१), बुचकेवाडी (२).