Crime
CrimeSakal Digital

जुन्नर : लग्नपत्रिकेतील नावावरून जिल्हा परिषद सदस्यांमध्ये जुंपली

जुन्नर, ता.२५ : लग्न सोहळ्यात झालेल्या वादातून पुणे जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे व पांडुरंग लांडे (दोघेही रा. केवाडी ता.जुन्नर) यांनी एकमेकांच्या विरोधात जुन्नर पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. पोलिसांनी दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.

हिवरेपठार (ता.जुन्नर) येथे एका लग्नसोहळ्याप्रसंगी दोघेही उपस्थित असताना ही घटना घडली. देवराम लांडे यांनी तुझे लग्नपत्रिकेत नाव नाही तू येथे कशाला आलास असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली, असल्याचे पांडुरंग लांडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तर देवराम लांडे यांनी दिलेल्या फिर्यादीत पांडुरंग लांडे हे लग्नाचे ठिकाणी ब्राह्मण म्हणून मंगलाष्टके म्हणण्यास आले असता. त्यांनी मला पुढे जायचे आहे, लवकर उरकून घ्या, असे म्हटल्याने त्यांना आमची भावकी येऊ द्या, असे म्हटले असता मी वारकरी संघटनेचा लीडर आहे तुम्हाला पाहून घेतो, असे म्हणून पांडुरंग लांडे यांनी दमदाटी केल्याचे नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com