''आवाज कुणाचा''ला मंचरकरांची दाद

''आवाज कुणाचा''ला मंचरकरांची दाद

मंचर, ता. १३ : येथील विघ्नहर मंगल कार्यालयात नाटक नाट्य संस्थेच्या कलाकारांनी विनामूल्य सादर केलेल्या ''आवाज कुणाचा'' या नाट्याला नागरिकांनी भरभरून दाद दिली.
प्रशिक्षणार्थी कलाकारांसाठी नाटकाचे आयोजन केले होते.
नाटकाचे लेखक व दिग्दर्शक प्रफुल्ल रामदास लोंढे हे मंचरचे सुपुत्र असून त्यांनी नाट्य शास्त्रात मास्टर पदवी संपादन केली आहे. नाटक नाट्य संस्थेच्या वतीने मंचर येथे लहान मुलांसाठी नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा सुरू आहे.
ते म्हणाले “मुलींचे शिक्षण, घरच्या जबाबदाऱ्या, बंधन आणि शिक्षणा अभावी वाढलेली अनैतिकता यावर भाष्य करणारे नाटक सादर केले. त्यातून जनजागृती झाली.”

यावेळी डॉ. दिलीप नाहाटा, डॉ. कविता नहाटा, वाफगाव (ता.खेड) प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत तासगावकर, रामदास लोंढे यांनी प्रशिक्षणार्थी कलाकार व मुलांचा उत्साह वाढवला.

नाटक एक थेरपी आहे. यातून मुलांचे समुपदेशन केले जाते. त्यांना अभ्यास कसा करावा? शिक्षण म्हणजे का? त्याचा इतर ठिकाणी वापर कसा करावा? समाजातील गोष्टी त्यावर आपले मत, वाचन त्याचं महत्त्व आणि मग हळू हळू त्यांचा आत्मविश्वास वाढवतो. त्यापासून बौद्धिक विकासाला चालना मिळते.
प्रफुल्ल लोंढे, लेखक व दिग्दर्शक.

05323

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com