वाल्ह्यात स्वामी समर्थ यांच्या पादुकांचे जल्लोषात स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्ह्यात स्वामी समर्थ यांच्या पादुकांचे जल्लोषात स्वागत
वाल्ह्यात स्वामी समर्थ यांच्या पादुकांचे जल्लोषात स्वागत

वाल्ह्यात स्वामी समर्थ यांच्या पादुकांचे जल्लोषात स्वागत

sakal_logo
By

वाल्हे, ता. २ : अक्कलकोट पालखी परिक्रमेसाठी निघालेल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे वाल्हे (ता. पुरंदर) येथे फुलांच्या वर्षावात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मुरूम (ता. बारामती) वरून मार्गस्थ झालेल्या पालखी परिक्रमा सोहळ्याचे वाल्ह्यात आगमन झाले. यावेळी श्री स्वामी समर्थांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. सोहळा संत सावतामाळी मंदिरामध्ये विश्रांतीसाठी विसाव्याल्यानंतर श्री स्वामी समर्थांची महाआरती झाली. यावेळी सचिन लंबाते, बाळासाहेब भुजबळ, सागर भुजबळ, रणधीर खवले, किरण भुजबळ, राजकिशोर काबरा, समदास राऊत, सुरेश भुजबळ, दीपक भुजबळ, दत्तात्रेय राऊत, तानाजी चव्हाण, प्रदिप गायकवाड आदी उपस्थित होते. आरती झाल्यानंतर भाविकांनी स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतले. दर्शनानंतर सायंकाळी हा परिक्रमा सोहळा सासवडकडे मार्गस्थ झाला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top