चासला फुले जयंतीनिमित्त फॅन्सीड्रेस स्पर्धेचे आयोजन

चासला फुले जयंतीनिमित्त फॅन्सीड्रेस स्पर्धेचे आयोजन

चास, ता. ६ : येथील (ता. खेड) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी सावित्रीबाई फुलेंच्या आयुष्यातील उदबोधक घटनांचे विद्यार्थ्यांना दाखले दिले. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वेषभूषा करून शाळेमध्ये चैतन्य आणले होते. तसेच फॅन्सीड्रेस स्पर्धाही आयोजित केल्या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका संजिवनी घाटकर यांच्यासह सहशिक्षिका शुभांगी भुजबळ, सुरेखा मुंगसे, शोभा सुतार, योगिता संते, मनीषा रायकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रेया गायकवाड या सातवीतील विद्यार्थिनी सावित्रीबाईंच्या वेषात अध्यक्षस्थानी होती. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित विवीध भाषणे, सावित्रींच्या चारोळ्या सादर केल्या. मुख्याध्यापिका घाटकर यांनी सावित्रीबाई फुले यांनी केलेली शिक्षणाची क्रांती, मुलींसाठी शिक्षणाची गरज ओळखून त्यासाठी केलेले अथक प्रयत्न याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक सहशिक्षिका सुरेखा मुंगसे यांनी केले, सूत्रसंचालन अक्षता चौरे यांनी केले तर आभार मनिषा रायकर यांनी मानले.


33493

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com