रस्त्यावर बंदिस्त गटारांची मागणी

रस्त्यावर बंदिस्त गटारांची मागणी

कामशेत, ता. ५ ः येथील पवनानगर रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटाराचे काम करून, सांडपाणी निर्मूलनाचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी रस्त्याने जाणारे पादचारी आणि वाहन चालक करीत आहे. पवन मावळच्या पश्चिम भागातील सुमारे पन्नास गावांचा शहराशी संपर्क असलेला हा प्रमुख मार्ग आहे.
पवन मावळातील वाढते पर्यटन, चिखलसे, बौर परिसरातील कारखानदारी व उद्योग व्यवसाय, चिखलसे खिंडीतून द्रुतगती महामार्गाला जाणारा पर्यायी मार्ग यामुळे, या रस्त्यावर दिवसेंदिवस वर्दळ वाढली आहे. शेकडोंच्या संख्येने वाहने या रस्त्यावरून धावत आहे. इंद्रायणी कॉलनी, चिखलसे रोड, दौंडे कॉलनीसह येवलेवाडी परिसरात नागरीकरण वाढले आहे.
या वाढत्या नागरीकरणामुळे रहदारी वाढली आहे. अनेक नागरिक या परिसरात राहणे पसंत करीत आहे. त्यामुळे कामशेत पवनानगर रस्त्याला बाजारपेठ वाढू लागली आहे. शेकडो नागरिकांची वर्दळ असलेल्या या भागातील गटारे गायब झाली आहे. परिणामी सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने, गटारातील पाणी तुंबून दुर्गंधी पसरू लागली आहे. रस्त्याच्या कडेने जाणारे हजारो पर्यटक, नागरिक, महिला, वाहन चालक नाकाला रुमाल लावून जात आहेत.
मावळ तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष गणेश काजळे म्हणाले,‘‘ कामशेत पवनानगर रस्त्याने आमचे रोज येणे जाणे असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूची गटारे पक्की नाही. काही ठिकाणी सांडपाणी ब्लॉक झाले आहे. पाणी साचून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची गटारांची कामे लवकरात लवकर व्हावे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com