टीसी महाविद्यालयास बेसबॉलमध्ये विजेतेपद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीसी महाविद्यालयास
बेसबॉलमध्ये विजेतेपद
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास बेसबॉल स्पर्धेत विजेतेपद

टीसी महाविद्यालयास बेसबॉलमध्ये विजेतेपद

sakal_logo
By

बारामती, ता. १२ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या वतीने मुलांच्या आंतर महाविद्यालयीन बेसबॉल स्पर्धा येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथे नुकत्याच झाल्या. त्यात तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपद प्राप्त केले.
या स्पर्धेत बारामती व दौंडच्या दोन संघासह, इंदापूर, पुण्यातील सांगवी या सहा संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या संघाचा पहिला सामना दौंडच्या के. जी. कटारिया महाविद्यालयाविरूद्ध झाला. हा सामना टीसी महाविद्यालयाने चौदाविरूद्ध शून्य गुणांनी जिंकला. अंतिम सामना इंदापूरच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय संघाबरोबर झाला. हा सामना पाचविरूद्ध एक गुणांनी जिंकला.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामतीच्या संघाने संतोष कचरे, विजय महाडीक, स्वप्नील नरुटे, विशाल गोल्डे, अमित राऊत, स्वरूप भुजबळ, चैतन्य कट्टे, आकाश व्हने, रमेश गिरमकर, संदीप सावंत आणि श्रीकांत सपकाळ या सर्वांच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर विजेतेपद प्राप्त केले. या संघास डॉ. गौतम जाधव व अशोक देवकर यांचे मार्गदर्शन लाभले.
मुली व मुले यांच्या विजयी व उपविजयी कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शहा, संस्थेचे सचिव मिलिंद शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर यांनी अभिनंदन केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top