दुग्ध उत्पादक संस्थेने केली वीजचोरी

दुग्ध उत्पादक संस्थेने केली वीजचोरी

बारामती, ता. १३ : वीजमीटरमध्ये फेरफार करून पाच वर्षांपासून वीजचोरी करणाऱ्या गलांडवाडी (ता. दौंड) येथील मे. राजहंस दुग्ध उत्पादक संस्थेवर दीड कोटी रुपयांची वीजचोरी केल्याचा गुन्हा यवत पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.
राजहंस दुग्ध उत्पादक संस्था दुधावर प्रकिया करून त्याचे उपपदार्थ बनविते. महावितरणकडून त्यांनी औद्योगिक वापराची वीजजोडणी घेतली आहे. संस्थेच्या वीजमीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी होत असल्याची माहिती वीज कंपनीला मिळाली. त्याअनुषंगाने महावितरणच्या बारामती येथील भरारी पथकाने डिसेंबर महिन्यात तपासणी केली.
सकृतदर्शनी वीजमीटरचे सील तोडून फेरफार केल्याचे दिसून आले. तेव्हा संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संदीप शितोळे यांच्या समक्ष पंचनामा करून वीजमीटर तपासणीसाठी बारामती येथील चाचणी विभागात आणण्यात आले. त्यानंतर ज्या कंपनीने ते वीजमीटर बनविले आहे, त्या कंपनीच्या प्रतिनिधीला बोलावून मीटरचा ‘एमआरआय’ काढण्यात आला. त्यामध्ये

सदर मीटरमध्ये १० ऑगस्ट २०१६ पासून ९ डिसेंबर २०२१ (मीटर ताब्यात घेईपर्यंत) तब्बल ६४ महिने वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाले. वीजचोरीच्या कालावधीत २४ लाख ७५ हजार १६८ इतका वीजवापर होणे अपेक्षित होते. परंतु, जादा वापराच्या काळात मीटर बंद करून फक्त १६ लाख १५ हजार ६९ इतकाच वीजवापर होऊ दिला. परिणामी ८ लाख ६० हजार ९९ इतक्या युनिटची नोंद मीटरमध्ये झाली नाही. चोरी केलेल्या या युनिटपोटी १ कोटी ३३ लाख ७८ हजार व विद्युत कायद्यातील तरतुदीप्रमाणे तडजोड शुल्कापोटी १६ लाख २० हजार असे १ कोटी ४९ लाख ९८ हजार ६२० रुपयांचे देयक ग्राहकाला देण्यात आले. मात्र विहित मुदतीत ग्राहकाने ही रक्कम भरली नसल्याने प्रथम बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन तो यवत पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
ही वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी सुरक्षा व अंमलबजावणी परिक्षेत्राचे उपसंचालक कमांडर शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक कोथले, सहाय्यक अभियंता महेश कटारे, सहा. सुरक्षा अधिकारी नागनाथ कोरे व संदीप मंडले, वरिष्ठ तंत्रज्ञ विनोद देवणे व जयकुमार गावडे यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com