बारामती परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात

बारामती परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात

बारामतीत रोषणाईने उजळला परिसर

बारामती, ता. १४- : कोविडच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षांनंतर आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध भागातील जयंती उत्सव मंडळांनी रॅली काढून जल्लोष केला. आकर्षक रोषणाईने संपूर्ण बारामती परिसर उजळून निघाला होता.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज बारामतीत जनसागर लोटला होता. बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजिक सकाळी धार्मिक पूजापाठाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, तहसीलदार विजय पाटील यांच्या हस्ते आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, भारत अहिवळे, माजी नगरसेवक सुभाष ढोले, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलीस निरीक्षक सुनील महाडीक, राजेंद्र सोनवणे, गणेश सोनवणे, नवनाथ बल्लाळ, बिरजू मांढरे ,आरती शेंडगे ,अनिता जगताप, मयूरी शिंदे, शुभम अहिवळे, काळूराम चौधरी, अप्पा अहिवळे, ॲड. विनोद जावळे उपस्थित होते.
यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने सलामी दिली गेली. शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
मध्यरात्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे फटाक्यांची आतषबाजी करत आंबेडकर अनुयायांनी सामूहिक पूजा पाठाचा कार्यक्रम झाला. बारामती शहरातील चंद्रमणीनगर बुद्ध विहार, पंचशील नगर, सटवाजी नगर येथे जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. संध्याकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

04853

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com