वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेत वृक्ष कुंड्यांचे वाटप

वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेत वृक्ष कुंड्यांचे वाटप

चास, ता. १४ : खेड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी लीगल सेलचे तालुका अध्यक्ष अॅड. अरुण मुळूक यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त राजगुरुनगर (ता. खेड) न्यायालयात व आखरवाडी मोहरवाळ (ता. खेड) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत वृक्ष कुंड्यांचे वाटप केले. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेता हा उपक्रम राबविण्यात आला. याबरोबरच न्यायालय परिसरात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर व राजगुरुनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष देविदास शिंदे पाटील यांच्या हस्ते वृक्ष कुंड्या वाटप करण्यात आल्या. यावेळी राजगुरुनगर न्यायालयाचे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश जी. बी. देशमुख, राजगुरुनगर न्यायालयाचे कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश डी. बी. पतंगे, दिवाणी न्‍यायाधीश कनिष्‍ठस्‍तर एन. एस. कदम, राजगुरुनगर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अनिल राक्षे, ॲड. बाळासाहेब लिंबोरे पाटील, अॅड. समीर कुलकर्णी, अॅड. वैभव कर्वे, अॅड. माणिक वायाळ, ॲड. अतुल गोरडे, अॅड. उज्ज्वला माळी, अॅड. बिभीषण पडवळ, अॅड. राजेश कुलकर्णी, अॅड. सुनील चव्हाण, ॲड. सुवर्णा ढोरे उपस्थित होते.

CHS13 P2

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com