गाडी अंगावर घालणाऱ्या तरुणास अटक

गाडी अंगावर घालणाऱ्या तरुणास अटक

पुणे, ता. १४ : लष्कर परिसरात खरेदीसाठी गेलेल्या महिलेस अपशब्द वापरणाऱ्या तरुणास जाब विचारणाऱ्या महिला व तिच्या पतीच्या अंगावर गाडी घालण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तरुणाला अटक केली. ही घटना १२ जानेवारीला कोंढव्यातील साळवे गार्डन रस्ता परिसरात घडली.
समीर सय्यद (वय ३५. रा. गुरुवार पेठ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिला व त्यांचे पती लष्कर परिसरात खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी महिलेची तरुणासोबत वादावादी झाली. फिर्यादीने त्याची कॉलर पकडली, त्याचा राग आल्यामुळे समीरने त्यांना महिलेस मारहाण करून त्यांचा विनयभंग केला. या घटनेनंतर फिर्यादी महिला पतीसोबत दुचाकीवरून जात होती. त्यावेळी समीरने त्याच्या कारने फिर्यादीच्या दुचाकीला जोरात धडक देऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com