आरोग्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य
आरोग्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्यsakal

सत्तेवरील राजकारण्यांचा पत्रकारितेला विरोध : डॉ. वैद्य

सत्तेवर आलेले राजकारणी पत्रकारितेला विरोध करतात, ही मोठी शोकांतिका असल्याचे डॉ. अभिजित वैद्य यांनी सांगितले

भोर : सत्तेवर आलेले राजकारणी पत्रकारितेला विरोध करतात, ही मोठी शोकांतिका असल्याचे आरोग्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य यांनी सांगितले. छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. शाहू फुले आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, भोर तालुका पत्रकार संघ आणि भोर तालुका मेडीकल प्रॅक्टिशनर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमास प्रा. टी. वाय. जेटीथोर, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष भुजंगराव दाभाडे, विचार प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव, डॉ. आनंदा कंक, प्रफुल्ल बनसोडे, प्रा. रवींद्र भालेराव, विजया पाटील, ज्ञानोबा घोणे, बार्टीच्या समन्वयक सुनीता गायकवाड, भारती मोरे, आरोग्य सेनेचे हनुमंत बहिरट उपस्थित होते.

‘छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील पत्रकारिता आणि त्यामधील महाराजांचे योगदान’ या विषयावर डॉ. वैद्य यांनी मार्गदर्शन केले. डॉ. वैद्य म्हणाले, ‘‘छत्रपती शाहू महाराज हे सर्वधर्मीयांचे राजे होते. ते कधीही विलासी जीवन जगले नाहीत. शाहू महाराजांनी त्या काळी पत्रकारितेचे महत्त्व ओळखले होते. म्हणूनच त्यांनी कोल्हापूर संस्थानातील विचारवंत पत्रकारांना जवळ केले होते. परंतु सद्यःस्थिती फार बदलली असून सत्ताधारी झाल्यानंतर पत्रकारितेला विरोध केला जात आहे.’’
प्रा. विजय जाधव यांनी प्रास्ताविक, सुजाता भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. सुहित चव्हाण यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com