आळंदीत कोटी तीर्थकुंडाची सफाई

आळंदीत कोटी तीर्थकुंडाची सफाई

आळंदी, ता. २० : आळंदीत कोटी तीर्थकुंडाची सफाई अविरत श्रमदान, गडकिल्ले सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केली. शहरातील कुंडे पुर्नजीवित करून ती पुन्हा वापरात यावी यासाठी आगामी काळात सातत्य ठेवणार असल्याचे स्वच्छतादूत अॅड. नजिम शेख, माजी नगरसेवक सचिन गिलबिले यांनी सांगितले.
स्वच्छता अभियानात गडकिल्ले सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष संतोष घुले, रविराज फुगे, जनार्दन घुले, अमोल कोरडे तसेच अविरत श्रमदानचे जितेंद्र माळी, कैलास माळी, सिद्धू औसर, गिरीश आणि निलम गव्हाळे, रामदास भोसले, ऋषिकेश जाधव, निस्सार सय्यद आदी सदस्य उपस्थित होते.
तसेच यापूर्वी तीर्थक्षेत्र आळंदी येथे हेरिटेज वॉकचा उपक्रम राबविला गेला. यामध्ये नजिम शेख यांनी या सर्व कुंडांचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले. आळंदी नगरपरिषदेच्या परवानगीने कोटीतीर्थ कुंडावर श्रमदान करण्यात आले. अत्यंत दयनीय अवस्थेत आणि पूर्णतः दुर्लक्षित असलेल्या या कुंडाची आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली. या वेळी कुंडाच्या बाजूने आलेले गवत, काटेरी झुडपे हटविण्यात आली.
या वेळी ॲड. शेख, गिलबिले म्हणाले, ‘‘आळंदी शहरात अनेक कुंड आहे. केवळ या कोटीतीर्थ कुंडामुळे दुष्काळातही जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध झाले होते. मात्र गेली तीस वर्षात हे कुंड चिखल, खुरटे गवत आणि कचऱ्याच्याखाली दबले गेले होते. दरम्यान शहरातील बावन्न कुंडाची शोध मोहीम सुरु आहे. आळंदीतील कुंडांची सफाई करून वापरासाठी उपलब्ध करण्याचा मानस आहे. या उपक्रमास पांडुरंग पाटील, सीमा शिंदे यांचे सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com