चऱ्होली वडमुखवाडी भागात 
एक कोटींची थकबाकी

चऱ्होली वडमुखवाडी भागात एक कोटींची थकबाकी

आळंदी, ता. २७ ः चऱ्होली वडमुखवाडी भागात एक कोटी नऊ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी वसूल करणे बाकी आहे. महावितरणकडून थकबाकी वसूल मोहीम सुरू असून एक हजार रुपये वीजबिल थकबाकी असलेल्या ग्राहकांकडून थकीत रक्कम वसुलीचे कामकाज सुरू असल्याची माहिती येथील कनिष्ठ अभियंता विजय पाटील यांनी दिली.
अनेकजण वीजबिल भरत नसल्याचे चित्र आहे. गावठाणातील ग्राहकांपेक्षा नव्याने झालेल्या सोसायट्यांमधील ग्राहकांकडे थकीत रकमेचा भरणा करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांकडून तगादा लावला जातो. प्रसंगी किरकोळ रकमेसाठी वीज कनेक्शनही तोडले जाते. सध्या एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकीदार असलेले सहा ग्राहक आहेत. त्यांच्याकडील सहा लाख सहा हजार रुपयांची थकबाकीसाठी वसूल मोहीम सुरू असून वेळेत न भरल्यास वीजजोड तोडणार आहे. सोबत एक हजार रुपयांचा थकबाकीदारांना वीजबिल भरणा करण्यास प्रेरित केले जाते. तरीही वीजबिल भरले नाही तर लवकरच वीज कनेक्शन तोडणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
वीजबिल भरण्यासाठी अनेकांची पसंती ऑनलाइन भरणा करण्याकडेच आहे. मात्र, सोसायट्यांमध्ये बिलाची पावती वेळेत मिळत नाही. त्याचप्रमाणे वाडी वस्तीवरही वीजबिल वेळेत न मिळाल्याने किरकोळ थकबाकी राहते. परिणामी थकीत रकमेचा आकडा वाढतो. वीजबिल वाटपात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वेळेत बिल द्यावे अशी मागणी होत आहे.
चऱ्होली वडमुखवाडी भागात सध्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आहे. याठिकाणच्या कमर्शिअल आणि घरगुती मिटर घेतलेल्या ग्राहकांची स्वतंत्र आकडेवारी मात्र अद्याप उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. याबाबत महावितरणने पाठपुरावा केल्यास उत्पन्नात आणखी भर पडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com