मुक्काम तळावर सुविधा उपलब्ध व्हाव्यात

मुक्काम तळावर सुविधा उपलब्ध व्हाव्यात

आळंदी, ता. २६ : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर रस्ता रुंदीकरण आणि विकासकामात मागील वर्षापासून वेग मंदावला आहे. सोहळ्यादरम्यान पालखी मार्गावर उड्डाणपुलाच्या कामाजवळ सेवा रस्ता आणि मुक्कामाच्या तळावरील जागेत सुविधा वारी सुरु होण्यापूर्वी जलदगतीने होणे अपेक्षित असल्याचे आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.
आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाची पाहणी करण्यासाठी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त ॲड विकास ढगे, सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राणा महाराज वासकर, दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोसावी, सचिव मारुती कोकाटे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष भागवत चवरे, व्यवस्थापक माऊली वीर, राजाभाऊ चोपदार यांच्यासह विविध ठिकाणचे तालुका प्रशासन उपस्थित होते.
वीर म्हणाले, ‘‘आळंदीहून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ११ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत आहे. यानिमित्ताने सासवड ते भंडीशेगाव मार्गाची आणि तळाची पाहणी केली. सोलापूर जिल्ह्यात सोहळा २३ जून रोजी प्रवेश करीत असून पुरंदावडे, पानीवपाटी, ठाकुरबुवा, बाजीराव विहीर येथे सोहळ्याचे गोल रिंगण आहे. पालखी महामार्गात जागा गेल्याने या रिंगणासाठी जागा अपुरी पडत आहे. शासनाने रिंगणासाठी वाढीव जागा उपलब्ध करून द्यावी. सोलापूर जिल्हा सीमेवर कारुंडे गावच्या पुढे दुपारच्या विसाव्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, माळशिरस व वेळापूर येथील पालखी तळावर अतिक्रमण झाल्याने येथे मुक्कामी असणाऱ्या दिंड्यांची रचना बदलली आहे. वेळापूरमध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम लवकर व्हावे.’’
विविध ठिकाणी सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे दिंड्या व दिंड्यांची वाहने मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला उशीर होणार आहे. उड्डाणपुलाच्या बाजूने काढलेला पर्यायी मार्ग लहान आहे. परिणामी सेवा रस्त्याची आवश्यकता आहे. सासवड नातेपुते प्रस्तावित जादाचा पालखी तळ भूसंपादन, जेजुरी तळावर संरक्षक भिंत, लोणंद वेळापूरचे शौचालय तातडीने होणे आवश्यक आहे. फुरसुंगी ते दिवे घाट साइड रस्त्याचे काम करावे आदी सुचविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com