बैलगाडा शर्यतीत वाचला मुलाचा जीव

बैलगाडा शर्यतीत वाचला मुलाचा जीव

आळंदी, ता. २८ : निमगाव खंडोबा (ता. खेड) येथे बैलगाडा शर्यतीच्या शेवटी विजयाचे निशाण पडत असताना अचानक आलेल्या एका मुलाला बैलगाड्यापुढील धावणाऱ्या घोडीची धडक बसली. यामुळे मुलगा खाली पडला. दरम्यान, तो त्वरित बाजूला झाल्याने बैलगाड्या खाली येतायेता सुदैवाने बचावला. मात्र, त्यास मुलास प्रमाणात दुखापत झाली आहे. या घटनेचा अंगावर शहारा आणि थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. यामुळे शौकीनांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
खरेतर बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी अन्य शौकिनांप्रमाणेच हा मुलगा घाटाच्या शेवटच्या टोकाला मित्रांसोबत होता. मात्र, शर्यत सुरू झाली. घोडी आणि बैलगाडा वेगात पाठोपाठ धावत होते. शिट्ट्या आणि टाळ्यांचा आवाज सुरु होता. आपल्याच दिशेने हे घोडे आणि बैलगाडा येताना या मुलाला आणि त्याच्या मित्राला दिसले. तेव्हा सर्वांनी बाजूला पळ काढला. मात्र, हा मुलगा त्या घोडीच्या समोर आल्याने ती घोडी त्या मुलाला वेगात धडकली. किंबहुना त्यामुळे घोडी आणि घोडीवर बसलेला व्यक्ती आणि तो मुलगा खाली पडला. पुढे घोडी आणि स्वार उठून निघून गेले. मात्र, त्या घोडी पाठोपाठ येणाऱ्या बैलगाडा आणि बैलाने त्या मुलाच्या अंगावरून उडी मारली व पुढे गेला. त्यामुळे त्या मुलाचा जीव थोडक्यात बचावला. या अपघातात मुलगा जखमी झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com