आळंदीत वारी काळात चोवीस तास पाणीपुरवठा

आळंदीत वारी काळात चोवीस तास पाणीपुरवठा

आळंदी, ता. ७ : आषाढी वारी काळात शहरात चोवीस तास विभागवार पाणीपुरवठा केला जाणार आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी एकशे तीस सीसीटीव्ही कॅमेरा शहरात लावले आहेत. वारीत आलेल्या वारकऱ्यांना आरोग्याची समस्या जाणवू नये यासाठी पंधराशे शौचालये आणि चोवीस तास तीन सत्रात शहर स्वच्छता केली जाणार असल्याची, माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
पालिकेने शहरात बावीस टॅंकर ठेवले असून विकेंद्रित पद्धतीने पाच ठिकाणी टँकर भरण्याची व्यवस्था केली. या सर्व ठिकाणी विद्युत पुरवठा व कर्मचारी चोवीस तास असावेत असे आदेश मुख्याधिकारी यांनी दिले आहेत. पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता, मोटारींची दुरुस्ती, टीसीएल पावडर व इतर साहित्य खरेदी इत्यादी तयारी पूर्ण झाली आहे.
उघड्यावर शौचास मनाई असून सुलभ शौचालयाबरोबरच पंधराशे शौचालये तात्पुरती व्यवस्था म्हणून तयार ठेवले. शौचालयांना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी अनेक ठिकाणी स्वतंत्र पाइपलाइन टाकून काम करून घेतले आहे. तिर्थक्षेत्रातून यापूर्वी बत्तीस ठिकाणी पक्की शौचालये प्रत्येकी वीसप्रमाणे बांधले आहेत. शहर स्वच्छतेसाठी तीनशे कर्मचारी नेमले आहे.
शहरातील मंदिर व इंद्रायणी घाट परिसरातील तसेच इतर महत्त्वाच्या सर्व ठिकाणचे एकूण सतरा हायमास्ट चालू केले आहे. मोबाईल टॉयलेट यांना विद्युत व्यवस्था करून देण्यात आली आहे. बाह्यवळण रस्त्यावरील दिवाबत्तीची दुरुस्ती करण्यात आली आहे. पाणी पुरवठा केंद्र याठिकाणी अडीचशे केव्हीए क्षमतेच्या जनरेटरची व्यवस्था पालिकेमार्फत करण्यात आली आहे.

तिसरा डोळा ठेवणार नजर
पालिकेमार्फत आळंदी शहरात सर्व महत्त्वाच्या ठिकाणी एकूण एकशेतीस सीसीटीव्ही कॅमेरे आणि तीन मोठ्या स्क्रीन देखील बसविण्यात आले असून पोलिस यंत्रणेस चोरीच्या घटना रोखण्यात व इतर तपासात याची मोठी मदत होणार आहे. पोलिस आणि वैद्यकीय मदत कक्ष चौकांमध्ये वार‍कऱ्यांना मदतीसाठी असणार आहे. वारीत बंदोबस्तास येणाऱ्या बाराशे पोलिसांची राहण्याची व्यवस्था केली आहे.

तयारी दृष्टिक्षेपात...
-३ मोठ्या स्क्रीन
-१५०० शौचालये
-१७ हायमास्ट दिवे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com