Dnyaneshwari Parayana
Dnyaneshwari Parayanasakal

Dnyaneshwari Parayana : माजी सैनिकांनाही लागली ज्ञानेश्वरीची गोडी

शस्त्राकडून शास्त्राकडे आणि शौर्याकडून अध्यात्माकडे हा मूलमंत्र घेत राज्यभरातून आलेल्या एकशे सव्वाशेहून अधिक माजी सैनिकांनी आळंदीत अवघ्या विश्वाच्या कल्याणाचे दान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी पारायण केले. देशसेवा करत असताना सततचा ताण होता. मात्र, सैन्य दलातून निवृत्तीच्या मार्गावर आल्यानंतर संतविचारांतून तणावमुक्तीची अनुभूती या माजी सैनिकांनी हरिनाम सप्ताहाच्या रूपाने अनुभवली.

आळंदी : शस्त्राकडून शास्त्राकडे आणि शौर्याकडून अध्यात्माकडे हा मूलमंत्र घेत राज्यभरातून आलेल्या एकशे सव्वाशेहून अधिक माजी सैनिकांनी आळंदीत अवघ्या विश्वाच्या कल्याणाचे दान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी पारायण केले. देशसेवा करत असताना सततचा ताण होता. मात्र, सैन्य दलातून निवृत्तीच्या मार्गावर आल्यानंतर संतविचारांतून तणावमुक्तीची अनुभूती या माजी सैनिकांनी हरिनाम सप्ताहाच्या रूपाने अनुभवली.
आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिरात भारतीय सैनिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा झाला. यासाठी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे यांनी सहकार्य केले. याबाबत सप्ताहाचे संयोजन माजी सैनिक डॉ. सुनील बोधे, व्यंकट खाडगे, सुधीरचंद्र जगताप, उमेश बाबर, राधा बेळगे यांनी केले.

आसाम येथील सीमा सुरक्षा दलातील सैनिकाची माता राधा बेळगे म्हणाल्या, ‘‘माझा मुलगा सैन्यात असल्याने आपणही सैनिकांची सेवा करावी, यासाठी आळंदीत आलो. इथे आलेला प्रत्येक माजी सैनिक सैन्यदलात असताना एकमेकांशी दररोज भेटतो. मात्र, निवृत्त झाल्यानंतर त्यांची आळंदीत भेट झाल्यावर आनंदाने एकमेकांना मारलेली मिठी सर्वकाही सांगून जाते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. मी इथे प्रसाद वाटप करण्याचे काम केले. अध्यात्म आणि आनंदाची वेगळीच अनुभवी माजी सैनिकांनी अनुभवली. ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळानिमित्त दीपोत्सव झाला. नगरप्रदक्षिणा व मिरवणूक झाली. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद देण्यात आला.

‘‘राज्यातील विविध जिल्ह्यांसह बेळगाव निपाणीमधून माजी सैनिक ज्ञानेश्वरी पारायणात सहभागी झाले होते. शाकाहार तसेच संत परंपरेचे विचार माजी सैनिकांमधे रूजावेत, या हेतून हा उपक्रम सुरू केला आहे. या सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. प्रत्येक सैनिकामध्ये मातृभक्ती, देशभक्ती असतेच. यामुळे हरिनामाची भक्तीही त्यांच्यामध्ये असते. या भक्तीपोटी विविध भागांतून माजी सैनिकांनी अध्यात्माचा आनंद घेतला. प्रत्येक माजी सैनिक येथून जाताना शाकाहार जीवन पद्धतीचा अवलंब करतो. हे आमच्या उपक्रमाचे यश आहे.
- सुधीरचंद्र जगताप, संयोजक, भारतीय सैनिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

माजी सैनिकांचेच कीर्तन
ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात विशेष म्हणजे सर्व माजी सैनिकांनीच कीर्तनसेवा केली. यामध्ये हनुमंत पवार (सातारा), निवृत्ती गलांडे (वडगाव शेरी, पुणे), ब्रिगेडिअर डॉ. सुनील बोधे (सातारा), सर्जेराव पावळ (मुंबई), पंडित स्वामी कन्हेरे (पनवेल), वसंत थोरमिसे (नाशिक).

असा होता दिनक्रम
- सकाळी सात ते साडेबारा ज्ञानेश्वरी वाचन
- दुपारी तीन ते चार प्रवचन
- सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ
- साडे सहा ते साडे आठ कीर्तन
आळंदी ः बेळगाव निपाणीसह राज्यभरातून आलेले माजी सैनिक ज्ञानेश्वरी पारायण करताना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com