चोरीला गेलेल्या मोबाईलचा तपास

चोरीला गेलेल्या मोबाईलचा तपास

आळेफाटा, ता. २७ : आळेफाटा (ता. जुन्नर) येथील कोहिनूर मोबाईल शॉपीमधून चोरीला गेलेले १३ लाख रुपये किमतीचे मोबाईल व इतर साहित्य पोलिसांनी तपास लावून दुकानदारास परत दिले.
आळेफाटा येथील ‘त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स’ या इमारतीतील कोहिनूर मोबाईल शॉपी या दुकानाचे शटर तोडुन ५ डिसेंबर रोजी चोरट्यांनी १३ लाख १३ हजार ८९० रुपये किमतीचे १४० मोबाईल व १ डीव्हीआर मशिन चोरून नेले होते. आळेफाटा येथील तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी पथके बनवून सूचना केल्या होत्या. त्यानुसार तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर व पथकाने ईश्वरालाल हिंमतलाल इरागर (वय ३२, रा. नायगाव बाफना चाळ, पालघर) व महावीर जोरसींग कुमावत (वय ३५, रा. पालघर) यांना ताब्यात घेतले. त्यांनी शाहीद अब्दुल सत्तार कपाडिया, तसेच संजय यादव ऊर्फ म्हात्रे यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली.
शाहीद याने चोरलेले मोबाईल हे दक्षिण आफ्रिका, नेपाळ, बांगलादेश या देशांमध्ये ममु या नावाने भेंडी बाजार या ठिकाणी विकून टाकले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ५ लाख रुपये किमतीच्या वाहनासह १४ लाख ५० हजार मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. चोरीला गेलेले मोबाईलची रक्कम कोहिनूर मोबाईलच्या मालकांच्या ताब्यात देण्यात आली.
सहायक फौजदार चंद्रशेखर डुंबरे, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, नविन अरगडे, हनुमंत ढोबळे, प्रशांत तांगडकर, सुनील कोळी यांनी तपासात सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com