आळेफाटा येथील उपबाजारामध्ये ५३ हजार कांदा पिशव्यांची आवक

आळेफाटा येथील उपबाजारामध्ये ५३ हजार कांदा पिशव्यांची आवक

आळेफाटा, ता. २ : आळेफाटा येथील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात कांद्याच्या ५३ हजार १५६ कांदा पिशवीची आवक झाली आहे. बाजारात एक नंबर कांद्यास दहा किलोला १०० रुपये बाजारभाव मिळाला आहे.
बाजारात मोढ्यात एक नंबर सुपर गोळा कांद्यास दहा किलोस ९० ते १०० रुपये बाजारभाव मिळाला तसेच एक नंबर कांद्यास ८० ते १०० बाजारभाव मिळाला‌‌. दोन नंबर कांद्यास ७० ते ८० रुपये बाजारभाव मिळाला. तर तीन नंबर कांद्यास दहा किलोस ४० ते ६० रुपये बाजारभाव मिळाला तर चिंगळी कांद्यास दहा किलोस २० ते ४० रुपये बाजारभाव मिळाला व बदला कांद्यास दहा किलोस २० ते ४० रुपये बाजारभाव मिळाला आहे. तसेच मध्यम कांद्यास दहा किलोस ५० ते ७० रुपये बाजारभाव मिळाला आहे.
दरम्यान, राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक फेब्रुवारी ते एक मार्च या एक महिन्याच्या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान जाहीर केल्याने येथील बाजार समितीत शुक्रवारी मार्च महिन्यातला शेवटचा दिवस असल्याने ५३ हजार पिशव्यांची आवक झाली, अशी माहिती आळेफाटा बाजार समितीचे व्यवस्थापक प्रशांत महांबरे यांनी दिली.

02688

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com