राजुरीत आजपासून हरिनाम सप्ताह

राजुरीत आजपासून हरिनाम सप्ताह

आळेफाटा, ता. ७ : राजुरी (ता. जुन्नर) येथील श्री कमलामाता देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने शनिवार (ता. ८) पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये दैनंदिन कार्यक्रमात काकडा, भजन, विष्णू सहस्त्रनाम, प्रार्थना, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ तसेच सायंकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत हभप श्रावण महाराज आहिरे, अनिलजी महाराज पाटील, कान्होबा महाराज देहूकर, उमेश महाराज दशरथे, संतविर बंडातात्या कराडकर, ॲड. जयवंत महाराज बोधले, चैतन्य महाराज देगलूरकर यांची कीर्तन सेवा होणार आहे.
या सप्ताहाच्या काळात चिकित्सा महाआरोग्य शिबिर, श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र यांचा दुर्गा सप्तशती पारायण सोहळा, जनावरांचे पशुवैद्यकीय शिबिराचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. १४) देवीच्या प्रतिमेची व पादुकांची, ग्रंथराज ज्ञानेश्वरीची राजुरी गावातून मिरवणूक काढण्यात येईल. तरी परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री कमलामाता उत्सव मंडळाच्या वतीने बाळू बुवा औटी, अनंता औटी, गणेश दूध संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब हाडवळे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com