आळे येथे शेतकरी छेडणार वीजपुरवठ्यासाठी आंदोलन

आळे येथे शेतकरी छेडणार वीजपुरवठ्यासाठी आंदोलन

आळेफाटा, ता.१३ : कडक उन्हाळ्यात पिकांना दररोज पाणी देणे गरजेचे असताना सध्या विजेच्या लपंडाव सुरू आहे. महावितरणने येत्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आळे (ता.जुन्नर) येथील शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याला दिला आहे.

सध्या कडक उन्हाळा सुरू असून, आळे (ता.जुन्नर) या गावातून पिंपळगाव जोगे धरणाचा कालवा गेला आहे. या कालव्यावर कोळवाडी, संतवाडी, शेळके मळा, आगरमळा, डावखर मळा येथील शेतकऱ्यांनी विविध पिके फुलविली आहेत.पण सध्या पाच पाच मिनिटाला वीज गायब होत आहे. पाणी असून देखील विजे अभावी पिके सुकून चालल्याने नुकसान होत आहे.
दरम्यान, बिबट्या प्रवण क्षेत्रात मोडत असून उसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक वेळा पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला करून ठार केलेले आहेत. तसेच माणसांवर देखील हल्ला झालेला आहे. त्यातच आठवड्यातून चार दिवस दिवसा व तीन दिवस रात्रीची थ्रिफेज लाईट असते. यामध्ये दिवसा जात असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यावे लागते. यामुळे गावास पुरेशा दाबाने दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com