वडगाव कांदळीत मंदिर जीर्णोद्धाराचे कार्यक्रम आजपासून

वडगाव कांदळीत मंदिर जीर्णोद्धाराचे कार्यक्रम आजपासून

आळेफाटा, ता. २० : वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार, मूर्तीप्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार (ता. २१) पासून बुधवार (ता. २४) या कालावधीत धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. गावातील विविध सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये गणपती पूजन, धान्यधिवास, अभिषेक, हवन,स्तोत्र पठण, महाआरती, ग्रामप्रदक्षिणा होणार असून दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत हभप उल्हास महाराज सूर्यवंशी (आळंदी), एकनाथ महाराज शास्त्री (परभणी), गुरूवर्य पांडुरंग महाराज घुले (अध्यक्ष गाथा मंदिर देहू) यांचे हरिकीर्तन होणार आहे. बुधवारी (ता. २४) मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा, श्री परमहंस स्वामी केशवानंद गिरीजी, हभप तुळशीराम महाराज सरकटे, हभप सुदाम महाराज बनकर यांच्या हस्ते होणार असून परिसरातील सर्व भाविकांनी या सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन श्री बिरोबा महाराज ग्रामविकास ट्रस्टच्या वतीने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com