नगदवाडीत येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन

नगदवाडीत येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन

आळेफाटा, ता. २२ ः सोयाबीन पिकासाठी योग्य बियाण्यांचा पुरवठा व्हावा, दर्जेदार बियाणे निर्मिती व्हावी यासाठी कृषी विभाग सतर्क असून तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन उगवण क्षमता प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात येत आहे. वडगाव कांदळी, नगदवाडी (ता. जुन्नर) येथील शेतकऱ्यांना कृषी सहायक एम. एस. गायकवाड यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले.
सोयाबीन बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासून घ्यावी, असे आवाहन कृषी सहायक एम. एस. गायकवाड यांनी केले. सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता तपासून घेतल्यावर शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होऊन वेळ व कष्ट वाचणार आहेत.
कृषी विभागाकडून बियाणे उगवण क्षमता चाचणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. गावातील शेतकरी श्यामराव बढे, रघुनाथ बढे, सुनंदा दादाभाऊ बढे, पंढरीनाथ बढे, सोपान भोर, शिवाजी पिंगळे, नवनाथ भोर या शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्यांचे उगवण चाचणी प्रात्यक्षिक करण्यात आले. या मार्गदर्शन शिबिरात वडगाव कांदळी गावच्या सरपंच उल्का पाचपुते, कांदळी तंटामुक्तीचे सदस्य रघुनाथ बढे, दिनकर बढे, विकास बढे, नितीन कुतळ, मंगेश बढे, अविनाश बढे, ज्योती बढे, निर्मला बढे, कुंदा बढे, मंदा बढे, पल्लवी बढे, सुनंदा बढे, रत्‍नाबाई थोरात, आशा बढे इत्यादी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com