भैरवनाथ विद्यालयास माजी विद्यार्थ्यांकडून मदत

भैरवनाथ विद्यालयास माजी विद्यार्थ्यांकडून मदत

पारगाव, ता. २ : लोणी (ता. आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ विद्याधाम विद्यालयातील १९८६मध्ये दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून नुकतेच तब्बल ३६ वर्षानंतर विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यास या बॅचचे संपूर्ण राज्यभरातून एकूण ५० माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयास ५१ हजार रुपयांची देणगी दिली.
मेळाव्याची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व सरस्वतीच्या पुजनाने सहकारी माजी सैनिक व पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला तर शालेय जीवनात घडलेल्या गमतीजमती ऐकताना सर्वजण भूतकाळात हरवून गेले होते. या शाळेतील शिक्षकांप्रती त्यांची असलेली प्रेम भावना व शाळेने दिलेल्या संस्काराच्या जोरावर यशाची गगनभरारी घेतल्याच्या भावना सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. कार्यक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने दहावी नंतरचा आपला प्रवास व कौटुंबिक परिस्थितीचे वर्णन आपल्या सवंगाड्यांना सांगितले.
माजी विद्यार्थी विलास वाळुंज यांच्या वतीने सर्वांना मासवडी, भाकरी, आमटीचे जेवण देण्यात आले. यावेळी अरुण गुळवे, शरद वाळुंज, अर्जुन गायकवाड, विठ्ठल वाळुंज, काळूराम आदक, तुकाराम पोखरकर, ज्ञानेश्वर वाळुंज, उदय डोके, बाळासाहेब वाळुंज, मच्छिंद्र आढाव, अंकुश लंके, मुनीर मोमीन, रंगनाथ विटकर, शेरअहमद पठाण, सोपान आदक, अशोक पोखरकर, नामदेव वाळुंज, पांडुरंग गायकवाड, रामचंद्र सिनलकर, संजय सिनलकर, अनिल शिंदे, रंगनाथ वाळुंज, कैलास सुक्रे, अनिल खराडे, भीमराव गायकवाड, वसंत भागवत उपस्थित होते
सुत्रसंचालन नवनीत सिनलकर यांनी केले. तर आभार अरुण गुळवे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com