भैरवनाथ सोसायटीच्या अध्यक्षपदी संभाजी पडवळ

भैरवनाथ सोसायटीच्या अध्यक्षपदी संभाजी पडवळ

पारगाव, ता. २३ : सविंदणे (ता. शिरूर) येथील भैरवनाथ सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संभाजी रभाजी पडवळ व उपाध्यक्षपदी जनाबाई किसन पडवळ यांची बिनविरोध निवड झाली. सोसायटीचे सहाय्यक निबंधक कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी सभा सहाय्यक निबंधक शंकर कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी अधिकारी श्रेणी एक ग.द.पुंड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. या दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे या बैठकीत जाहीर केले.

यावेळी सोसायटीचे सचिव रघुनाथ गोसावी, संचालक रामदास पडवळ, अरुणकुमार मोटे, कैलास किठे, हरिभाऊ पवार, नीलेश मिंडे, माणिक नरवडे, भाऊसाहेब पडवळ, बाळासाहेब पडवळ, बाळासाहेब लंघे, नवनाथ लंघे, शोभा लंघे, सरपंच शुभांगी लंघे, उपसरपंच भाऊसाहेब लंघे, ईश्वर पडवळ, माऊली पुंडे, बाळासाहेब भोर, बाळासाहेब पडवळ, दगडू पडवळ, दत्तात्रेय नरवडे, भक्तीराम पडवळ, फुलाजी लंघे आदी उपस्थित होते.

माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, दामुअण्णा घोडे यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com