अवसरी येथे बिबट बछडे 
विसावले आईच्या कुशीत

अवसरी येथे बिबट बछडे विसावले आईच्या कुशीत

पारगाव, ता. ५ : अवसरी बुद्रूक (ता. आंबेगाव) येथे यशवंत हिंगे यांच्या शेतात शनिवारी (ता. ४) सायंकाळी सापडलेली बिबट्याचे दोन बछडे पुन्हा त्याच जागेवर ठेवले होते. बिबट मादीने ते दोन्ही बछडे घेऊन गेल्याने बछडे आईच्या कुशीत विसावली आहेत.

शेतात ऊस तोडणी सुरु असताना दोन बछडे आढळल्याने ऊस तोडणी तातडीने थांबविण्यात येऊन वन विभाग व रेस्क्यू टीम सदस्य तत्काळ घटनास्थळी हजर झाले होते.

बिबट मादी याच परिसरात असण्याची शक्यता असल्याने बछड्यापासून दुरावलेली बिबट मादी चौताळेल या शक्यतेने दोन्ही बछडे जागेवरून न हलवण्याचा निर्णय घेतला व त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावला.

बिबट मादीने काही वेळातच एका बछड्याला घेऊन गेली व रात्री उशिरा पुन्हा येऊन दुसऱ्या बछड्याला घेऊन गेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com