शाश्वत पर्यटनाची संकल्पना राबवा

शाश्वत पर्यटनाची संकल्पना राबवा

पारगाव, ता.१२ : ''''ग्रामीण भागातील युवकांनी कृषी पर्यटन, साहसी पर्यटन, कॅरावॅन पर्यटनद्वारे शाश्वत पर्यटन ही संकल्पना राबवावी,'''' असे प्रतिपादन महाराष्ट्र पर्यटन संचालनालय च्या उपसंचालिका सुप्रिया करमरकर/ दातार यांनी केले.
पोंदेवाडी (ता.आंबेगाव) येथे वायाळ फार्म कृषी पर्यटन केंद्रावर शिवजयंती आणि महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन संचालनालय आणि वायाळ कृषी पर्यटन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने युवक युवतींसाठी एक दिवसाचे आदरतिथ्य, पर्यावरण संवर्धन, कृषी विकास शाश्वत पर्यटन विषयावर मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते.
यावेळी आयुर्वेदाचार्य आणि वेलनेस कोच डॉ वैशाली लोढा, वनपाल सोनल भालेराव कृषी सहाय्य्क निशा शेळके, उद्योजक संदीप निकम, बाळासाहेब आदक, सागर गायकवाड, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मुक्ताजी वायाळ, बंटी लबडे, अक्षय ढोबळे उपस्थित होते. करमरकर यांनी कृषी पर्यटन, साहसी पर्यटन तसेच शाश्वत पर्यटनावर मार्गदर्शन केले. डॉ. लोढा यांनी आदरातिथ्य, भारतीय संस्कृती, पौष्टीक आहाराचे महत्व आणि आरोग्यावर मार्गदर्शन केले. दरम्यान, सहभागी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले.
आयआरबीचे सरव्यवस्थापक रवींद्र वायाळ यांनी प्रास्तविक तर प्रतीक भोर यांनी आभार मानले.

02203

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com