
वडगावपीर येथील शर्यतीत शिंदे यांचा गाडा घाटाचा राजा
पारगाव, ता. १७ : वडगावपीर (ता. आंबेगाव) येथे श्री पीरसाहेब यात्रा उत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत एकूण १३० बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला. ‘घाटाचा राजा’चा मान कै. फक्कडराव मार्तंड शिंदे यांच्या गाड्याने पटकविला; तर फळीफोड प्रथम क्रमांक साई किरण गावडे (पूर) यांचा गाडा आला.
फळीफोडमध्ये द्वितीय क्रमांक विकास ज्ञानेश्वर पंचरास (लोणी), तृतीय क्रमांक अंकुश महादू बढेकर (धामणी), चतुर्थ क्रमांक गोरक्ष दत्तोबा सासवडे (शिक्रापूर) यांचे गाडे ठरले. तर, फायनलमध्ये प्रथम क्रमांक विशाल कोंडीभाऊ वाळूंज (लोणी), द्वितीय क्रमांक सुरेश रामभाऊ वाघ (रांजणी), तृतीय क्रमांक गणेश सुभाष लांघे (तेजेवाडी) यांनी बाजी मारली.
घाटाचे नियोजन माजी सरपंच संजय पोखरकर, रमेश आदक, विश्वनाथ साबळे, अरुण पोखरकर, सरपंच कोंडीभाऊ आदक, रामदास पालेकर, खरेदी विक्री संघाचे संचालक फकिरा आदक, विजय आदक, रवी ढगे पाटील, तुकाराम आदक, सावळेराम आदक व ग्रामस्थांनी केले.