आंबेगावच्या पूर्व भागातील
शेतकरी भरपाईपासून वंचित

आंबेगावच्या पूर्व भागातील शेतकरी भरपाईपासून वंचित

पारगाव, ता. २५ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या गारपिटीने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने नुकसानीचे पंचनामे केले असून, दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे.

१८ मार्च रोजी सायंकाळी तालुक्याच्या पूर्व भागातील धामणी, खडकवाडी, बढेकरमळा, पोंदेवाडी व रोडेवाडी परिसराला गारपिटीने जबरदस्त तडाखा दिला. या वेळी सुपारीएवढ्या गारांचा खच पडला होता. शेतातील तरकारी पिके, खरबूज, कलिंगड तसेच कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. दुसऱ्या दिवशी तत्कालीन तहसीलदार रमा जोशी यांनी या परिसरातील नुकसानीची पाहणी करून पंचनाम्याचे आदेश दिले होते. शेतकरी भरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी सांगितले. एकीकडे, कांदा आणि टोमॅटोला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर ही पिके फेकून देण्याची वेळ आली असतानाच गारपिटीने इतर पिकांचेही नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला असल्याचेही परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com