Sun, Sept 24, 2023

आंबेगावच्या पूर्वभागात गारांचा पाऊस
आंबेगावच्या पूर्वभागात गारांचा पाऊस
Published on : 29 May 2023, 4:20 am
पारगाव, ता.२९ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पारगाव, धामणी, मेंगडेवाडी व अवसरी बुद्रुक परिसरात आज सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. अवसरी बुद्रुक येथे वादळी वाऱ्या मुळे रस्त्यावर झाडे पडली वाहतूक विस्कळित झाली होती.
अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, टाव्हरेवाडी परिसरात पाऊस पडल्याने वरील गावातील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मेणबत्तीचा आधार घ्यावा लागला तर काढणीला आलेला कांदा, भुईमूग, पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सुरुवातीला वादळ वारे झाले त्यामुळे पावसाच्या अगोदरच वीजपुरवठा खंडित झाला तर रात्री नऊ वाजता पूर्ववत झाला. अवसरी बुद्रुक येथे गारपीट झाली मुख्य बाजारपेठेतून पाणी वाहत होते. शेतात कांदा साठवलेल्या शेतकऱ्यांची धावपळ झाली.