पोंदेवाडीत मोटार खड्ड्यात उलटली

पोंदेवाडीत मोटार खड्ड्यात उलटली

पारगाव, ता. ३१ : बेल्हे-जेजुरी महामार्गावर पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथे बुधवारी (ता. ३१) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास इको मोटार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली. मोटारीमधील दोघांचे नशीब बलवत्तर म्हणून फक्त किरकोळ जखमांवर निभावले, मात्र मोटारीचे मोठे नुकसान झाले.

बुधवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास इको मोटार (क्र. एम.एच.१२ आर.वाय. ३५१७) बेल्हे गावाकडून लोणी गावाकडे जात असताना पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील रोडेवाडीफाट्याच्या पुढे खडकवाडीच्या बाजूला मोटार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली व चारही चाके वर झाली. या अपघातात मोटारीमधील दोघांचे नशीब बलवत्तर म्हणून फक्त किरकोळ जखमावर निभावले. मात्र, मोटारीचे मोठे नुकसान झाले. दोन्ही जखमींचे गाव वडगावपीर असल्याची माहिती समजली आहे.

गतिरोधकांची मागणी
दरम्यान, बेल्हे-जेजुरी महामार्गाचे काम चांगले झाल्याने या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी वळणे असल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर धोकादायक ठिकाणी गतिरोधक बसवावे, अशी मागणी माजी उपसरपंच संदीप पोखरकर व नीलेश पडवळ यांनी केली. वाहनचालकांनीही वाहनाचा वेग मर्यादित ठेऊन वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे, असे संदीप पोखरकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com