म्हाळसाकांत खंडोबाची आजपासून धामणीत यात्रा
पारगाव, ता. ३१ : धामणी (ता. आंबेगाव) येथील श्री. म्हाळसाकांत खंडोबा देवाची यात्रा माघ पौर्णिमेनिमित्त रविवार (ता. १) ते सोमवार (ता. २) होणार आहे. नवसाच्या बैलगाडा शर्यती, कुस्त्यांचा आखाडा, करमणुकीच्या कार्यक्रमांबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात्रेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट व यात्रा उत्सव समितीने दिली आहे.
यात्रेनिमित्त रविवारी सकाळी ८ते ९ देवास हारतुरे, ११ ते ४ बैल व बगाड मिरवणूक व नवसाच्या बैलगाडा शर्यती, सायंकाळी ८ ते १० छबिना व पालखी सोहळा, रात्री १० वाजता छायाताई खिलारे बारामतीकर सह दीपककुमार बारामतीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी सकाळी ८ ते दुपारपर्यंत शाहीर रामदास गुंड आणि पार्टी (तुरेवाले) व शाहीर नाना साळुंखे आणि पार्टी (कलगीवाले) यांचा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ ते ६ कुस्त्यांचा आखाडा रात्री ९ वाजता साहेबराव नांदवळकर (वसंतराव नांदवळकर) सह रवींद्र पिंपळेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेची जय्यत तयारी धामणी, शिरदाळे, पहाडदरा, ज्ञानेश्वरवस्ती ग्रामस्थ व देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. येथील खंडोबाच्या नवसाची बगाडे आणि बैलगाडे पळवले जातात. यासाठी कोणत्याही प्रकारचे इनाम, बक्षिसे ठेवली जात नाही. भाविक भक्त आपल्या देवाच्या श्रद्धेपोटी धामणी घाटात नवसाचे बैलगाडे आणून पळवितात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

