भोर तालुक्यातील किल्ल्यांवर शिवाजी ट्रेलच्या वतीने दुर्ग पूजा

भोर तालुक्यातील किल्ल्यांवर शिवाजी ट्रेलच्या वतीने दुर्ग पूजा

भोर, ता. २७ः तालुक्यातील रायरेश्वर, केंजळगड, रोहिडेश्वर (विचित्रगड) व कावळा गड येथे दुर्ग पूजा करण्यात आली. पुणे येथील शिवाजी ट्रेल या संघटनेच्या वतीने गेल्या २७ वर्षांपासून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा उपक्रम राबविण्यात येतो. यावेळी गडांवरील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली.
शिवाजी ट्रेलच्या वतीने राज्यातील सर्व गड-किल्यांवर एकाच वेळी हा उपक्रम केला जात आहे. दुर्गपूजेबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. तालुक्यातील केजळगड या गडावर चंद्रकांत पारवे यांच्या हस्ते दुर्गपूजन करण्यात आले. यावेळी सौरभ चव्हाण, कृष्णा चव्हाण, ओंकार शिदे, ओंकार सोनवणे, मंदार चव्हाण, श्रुती पारवे, सुनील नागरगोजे व अथर्व पारवे उपस्थित होते. रायरेश्वर गडावर गजानन माकर, आमित भोरकर व विनोद वाघ यांच्या हस्ते दुर्गपूजन करण्यात आले. कावळा गडावर विनीत वाघ व रोहिडेश्वरावर राजेश महांगरे यांनी पूजन केले.

01379

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com