कचरा जाळून पर्यावरणपूरक होळी करा साजरी

कचरा जाळून पर्यावरणपूरक होळी करा साजरी

भोर, ता. ५ : ''''होळीच्या सणासाठी झाडे तोडून पर्यावरणाची हानी न करता कचऱ्याची होळी करून, पर्यावरणपूरक होळीचा सण साजरा करावा. नागरिकांनी विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांनी होळीसाठी वृक्षतोड करू नये,'''' असे भोरच्या उपविभागीय वन अधिकारी आशा भोंग यांनी केले.
तालुक्याच्या ग्रामीण भागात होळीच्या पारंपरिक सणासाठी वन विभागाच्या क्षेत्रातील झाडांची मोठ्या प्रमाणात तोड केली जाते. काही गावांमध्ये होळीसाठी झाडांची कत्तल केली जाते. गावातील सर्व ग्रामस्थ व तरुण एकजुटीने वृक्षतोड करतात. गेल्या वर्षी होळीसाठी खासगी क्षेत्रातील वृक्षतोड केल्याचा वाद पोलिस ठाण्यापर्यंत गेलेला आहे. काही गावांमध्ये तर जुन्या भांडणाचा राग काढून जाणीवपूर्वक खासगी क्षेत्रातील वृक्षतोड केली जात आहे. नागरिकांनी गावातील कचरा गोळा करून त्याची होळी केल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल आणि पर्यांवरणसाखळी नियमितपणे सुरु राहील. यासाठी गावपातळीवरील सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, तरुण मंडळ, बचत गटांच्या महिलांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे, असे भोंग यांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले.

होळीनंतर धूलिवंदनाच्या कार्यक्रमात केमिकलयुक्त कृत्रीम रंग लावल्यामुळे त्वचेचे व इतर आजार उद्भवण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रंगांऐवजी केवळ पाण्याचा वापर करण्यास नागरिकांनी पसंदी द्यावी, असे आवाहन काही पर्यावरणतज्ज्ञांनी केले आहे.

''भोर उपवनविभागांतर्गत येणाऱ्या भोर, वेल्हे व पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावांमधून नागरिकांनी पर्यावरणपूरक होळी सण साजरा करावा. होळीसाठी वन विभागाच्या क्षेत्रातील झाडांची तोड केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
- आशा भोंग, उपविभागीय वन अधिकारी, भोर

नागरिकांनी होळीचा सण विधायक व समाजउपयोगी उपक्रम करून आणि कोणत्याही वाद-विवादाशिवाय गोडीगुलाबीने साजरा करावा. अन्यथा वृक्षतोड किंवा रंग लावण्याच्या कारणावरून भांडणतंटे झाल्यास पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.
- विठ्ठल दबडे, पोलिस निरीक्षक भोर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com