भोरमध्ये तरुणाकडून धारदार शस्त्रे जप्त

भोरमध्ये तरुणाकडून धारदार शस्त्रे जप्त

भोर, ता. १२ : शहरात विनापरवाना कोयता व चॉपर यासारखे धारदार शस्र बाळगून दहशत पसरवणाऱ्या तरुणास पुण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (ता. ११) रात्री अटक केली. अनिकेत विलास सुकाळे (वय २४, रा. कांबरे, ता. भोर), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, शहरातील रामबाग चौकात ही कारवाई केली. आरोपीकडून एक कोयता व एक चॉपर, अशी धारदार शस्रे पोलिसांनी ताब्यात घेतली.
याबाबत भोर पोलिसांनी माहिती दिली की, पुण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुरुवारी (ता. ११) भोर शहर व परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना शहरात एकजण शस्र बाळगून फिरत असल्याची खबर मिळाली. या पथकाने त्वरित रामबाग चौकात सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना चॉपर व कोयता आढळून आला. पोलिसांनी त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यास भोर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यास शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. पोलिस हवालदार धर्मवीर खांडे हे पुढील तपास करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, हवालदार अमोल शेडगे, बाळासाहेब खडके व मंगेश भगत यांनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com