वरंधा घाटात मोटार धडकली

वरंधा घाटात मोटार धडकली

भोर, ता. १४ ः भोर- महाड मार्गावरील वरंधा घाटातील हिर्डोशी (ता. भोर) येथे मोटार रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडाला धडकली. रविवारी (ता. १४) सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास घटना घडली. सुदैवाने मोटारीत एअर बॅग असल्यामुळे कोणालाही इजा झाली नाही. स्थानिक प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील पाच-सहा तरुण हे दापोलीहून मारुती इर्टीका मोटारीतून पुण्याकडे येत होते. वरंधा घाटातील हिर्डोशी गावच्या हद्दीत मोटार डाव्या बाजूच्या डोंगराच्या बाजूला असलेल्या साईडपट्टीवरून घसरून दगडाला धडकली. त्यामुळे मोटारीचा डाव्या बाजूचा टायर फुटून चाकाची रीम वाकडी झाली. धडकेमुळे गाडीतील एअर बँग उघडल्या गेल्यामुळे गाडीतील कोणालाही इजा झाली नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोटार बाजूला केली. वरंधा घाटात या महिन्यात झालेला हा तिसरा अपघात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com