वेनवडीच्या आखाड्यात २५० मल्लांची हजेरी

वेनवडीच्या आखाड्यात २५० मल्लांची हजेरी
Published on

भोर, ता. १० : वेनवडी (ता. भोर) येथील काळभैरवनाथ ग्रामदेवाच्या यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात सुमारे २५० मल्लांनी हजेरी लावली. वेनवडी ग्रामस्थ मंडळ आणि दिलदार तरुण मंडळाच्या वतीने झालेल्या यात्रेच्या बुधवार (ता. ७) आणि गुरुवारी (ता. ८) दोन दिवसांमध्ये धार्मिक कार्यक्रमांबरोबर बैलगाडा शर्यती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कुस्त्या घेण्यात आल्या. विजेत्या पहिलवानांना शंभर रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंतची बक्षीसे देण्यात आली. इचलकरंजी येथील श्रीमंत भोसले हा कुस्त्यांमध्ये विजेता ठरला. तर पुण्याचा मनीष रायते उपविजेता ठरला. पंचायत समिती सदस्या सुषमा चव्हाण, विक्रम चव्हाण, प्रवीण शिंदे, शंकर चव्हाण, नरेश चव्हाण, दीपक चव्हाण, संदेश चव्हाण व मंगेश चव्हाण यांनी कुस्त्यांचे प्रायोजकत्व स्वीकारले. यात्रा कमिटीमधील सदस्य विक्रम चव्हाण, विशाल चव्हाण, अनिल चव्हाण, हनुमंत मळेकर, सचिन केदारी, किरण चव्हाण, नीलेश चव्हाण, बाळू चव्हाण, सागर चव्हाण, संतोष दुधाळ, संतोष शिंदे, बजरंग शिंदे आदींनी यात्रेचे आयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com