महिलेचे हातपाय बांधून ६३ लाखांची चोरी

महिलेचे हातपाय बांधून ६३ लाखांची चोरी

बारामती, ता. २३ : येथील देवकाते पार्क येथील एका घरातील महिलेचे हातपाय बांधून चोरट्यांनी ६३ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

रात्री सव्वा आठच्या दरम्यान ही घटना घडली असल्यामुळे या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. घरात घुसून महिलेचे हात पाय बांधून चोरी करणे ही घटना गंभीर स्वरूपाची मानली जात असून याप्रकरणी पोलिस आता कोणता तपास करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीन खरेदीसाठी आणून ठेवलेली ५५ लाख रुपयांची रोख रक्कम तसेच सोन्याची चैन, मिनी गंठण, अंगठी, कर्णफुले, मोबाईल असा जवळपास ६३ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

चार अज्ञात चोरट्यांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी नमूद केले. याप्रकरणी तृप्ती सागर गोफणे यांनी फिर्याद दिली असून पोलिस पुढील तपास पोलिस करत आहेत.

पाच पथकांची स्थापना
या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पाच पथकांची निर्मिती केली असून पोलिस विविध प्रकारे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. महिलेचे हातपाय बांधून चोरी केली जाणे ही बाब पोलिसांनी देखील गांभीर्याने घेतली असून याबाबत विविध तपास पद्धती आरोपींचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com