‘अनंत फ्लॉवर गार्डन’ झाले वर्षाचे
बागेचा वाढदिवस साजरा करण्याचा बारामतीत अनोखा उपक्रम

‘अनंत फ्लॉवर गार्डन’ झाले वर्षाचे बागेचा वाढदिवस साजरा करण्याचा बारामतीत अनोखा उपक्रम

बारामती, ता. २४ : अनेक वाढदिवस आपण ऐकले आणि पाहिले असतील....पण शहरातील वृक्षराजीने बहरलेल्या एका बागेचा वाढदिवस प्रथमच साजरा झाला. बारामती शहरात वर्षापूर्वी उभारलेल्या ‘फ्लॉवर गार्डन’चा नुकताच पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला.

शहरात अधिकाधिक झाडे असावीत, असा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा ध्यास आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी साकारलेल्या ‘अनंत फ्लॉवर गार्डन’चा पहिला वाढदिवस प्रत्येक झाडाला सजावट करून साजरा केला गेला. नागरिकांमध्ये वृक्षारोपणाप्रती जागरुकता वाढावी, हा या मागील उद्देश असल्याचे पाटील यांनी सांगितले. प्रत्येक झाडाभोवती रांगोळी काढून, झाडांना फुगे बांधून, पंचारतीने ओवाळून वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी स्थानिकांनी केक कापून या बागेचा वाढदिवस साजरा केला.

सोनचाफा, रातराणी, जाई-जुई आदी सुगंधी व सावली देणारी झाडे माऊलीनगरच्या परिसरात लावण्यात आली आहेत. पर्यावरण रक्षणासाठी झाडांना जपण्याची गरज आहे. तापमानवाढीचे संकट रोखण्यासाठी अधिकाधिक झाडे लावणे ही गरज आहे
- जय पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, बारामती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com