‘जनहित’च्या विद्यालयात 
अखंड सूर्यनमस्काराचा विक्रम

‘जनहित’च्या विद्यालयात अखंड सूर्यनमस्काराचा विक्रम

Published on

बारामती, ता. १ : येथील जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त (रथसप्तमी) विद्यार्थ्यांनी तब्बल १ लाख ४८ हजार ९११ सूर्यनमस्कार घालत विक्रम नोंदविला. बालभवन ते इयत्ता नववीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारी रोजी हा विक्रम नोंदविला.
या उपक्रमात ७४ विद्यार्थ्यांनी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येकी १४०१ सूर्यनमस्कार पूर्ण केले. बालभवन विभागाने सुमारे ८१९, तर प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सुमारे ९८६० सूर्यनमस्कार घालत सहभाग नोंदविला. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संचालक व पालकांनीही सूर्यनमस्कार घातले. विद्यालयाचे आचार्य हनुमंत दुधाळ यांनी ४०१ सूर्यनमस्कार घातले.
जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयात पंचकोशाच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांचा दररोज सकाळी सूर्यनमस्कार, योग व उपासना यांचा सराव घेतला जातो. या नियमित सवयीमुळे जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सूर्यनमस्कार सहज पूर्ण केले.
या कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक सचिन नाळे, अजिंक्य साळी यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक किशोर शिवरकर, उपाध्यक्ष किरण शहा (वाडीकर), हृषीकेश घारे, सचिव सतीश गायकवाड, खजिनदार सतीश धोकटे, संचालक धनंजय क्षीरसागर, मुख्याध्यापक अतुल कुटे, बालभवन प्रमुख नीलेश भोंडवे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com