खेड बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगूल

खेड बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगूल

चाकण, ता. २२ : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.
खेड बाजार समिती राज्यात मोठी असून, महत्त्वाची मानली जाते. या बाजार समितीचे एकूण १८ संचालक आहेत. बाजार समितीचे ३,९२३ मतदार आहेत. यामध्ये ११ संचालक सोसायटी मतदारसंघातून, चार ग्रामपंचायत मतदार संघातून, व्यापारी अडते २, माल मापाडी १, असे १८ संचालकांच्या जागा आहेत. कोणीही शेतकरी सोसायटी, ग्रामपंचायत यामध्ये कोणत्याही जागेवर उभा राहू शकतो. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोसायटी मतदारसंघात १२७४ मतदार, ग्रामपंचायत मतदार संघात १४२४, अडते-व्यापारी ९६७, हमाल-मापाडी २४९, असे मतदार आहेत.
येत्या २७ रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे, उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी २७ ते ३ एप्रिल आहे, अर्ज छाननी ५ एप्रिल, वैध उमेदवारांची यादी प्रसिद्धी ६ एप्रिल, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी ६ एप्रिल ते २० एप्रिल, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याची तारीख २१ एप्रिल, मतदान २८ एप्रिल, मतमोजणी त्यानंतर लगेचच, असा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिलेला आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी या आदेशाला मंजुरी दिल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे, अशी माहिती सहकारी संस्थांचे सहायक निबंधक व खेड बाजार समितीचे प्रशासक हरिश्चंद्र कांबळे यांनी दिली.
खेड बाजार समितीवर सध्या प्रशासक आहे. या बाजार समितीची निवडणूक लवकर व्हावी, अशी अनेक संचालक तसेच अनेक व्यापारी, अडते, सोसायटी सभासद, ग्रामपंचायत सभासद यांची मागणी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com