Bullock Cart Race chakan
Bullock Cart Race chakansakal

Bullock Cart Race : चाकण येथे उद्यापासून बैलगाडा शर्यती

शर्यतीत एकूण आठ लाख आठ हजार रुपये रोख रकमेची बक्षीसे देण्यात येणार; बैलगाडा शर्यती शनिवार रविवार दोन दिवस रंगणार

चाकण : येथील भैरवनाथ महाराजांच्या उत्सवास उद्यापासून (ता.५) प्रारंभ होत आहे. यानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. शर्यतीत एकूण आठ लाख आठ हजार रुपये रोख रकमेची बक्षीसे देण्यात येणार आहेत. बैलगाडा शर्यती शनिवार (ता. ६) व रविवार (ता.७) या दोन दिवस रंगणार आहेत.

शर्यतीत प्रथम क्रमांकाला एक लाख ५१ हजार रुपये, द्वितीय क्रमांक साठी एक लाख एकवीस हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी एक लाख एक हजार रुपये, चौथ्या क्रमांकासाठी एकाहत्तर हजार रुपये आदी रोख रकमेची बक्षीसे ठेवलेली आहेत, अशी माहिती भैरवनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष किसन गोरे यांनी दिली. बैलगाडा शर्यतीचे घाटाचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते होणार आहे.

उत्सवानिमित्ताने शुक्रवारी (ता.५) पहाटे पाच वाजता भैरवनाथ महाराजांची पूजा, सकाळी नऊ वाजता हरतुरे व मांडव डहाळे मिरवणूक, सायंकाळी सहा वाजता पालखी मिरवणूक होणार आहे. लावण्यांचा कार्यक्रम शुक्रवारी रात्री नऊ वाजता मार्केटयार्ड येथे होईल. मराठी शाळा येथे शनिवारी (ता.६) रात्री लावण्याचा कार्यक्रम होईल तर सोमवारी (ता.८) कुस्त्यांचा आखाडा संग्रामदुर्ग किल्ला येथे होणार आहे. उत्सवाचे आयोजन श्री भैरवनाथ यात्रा कमिटी चाकण व समस्त ग्रामस्थ चाकण यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com