कंटेनरच्या धडकेमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू

कंटेनरच्या धडकेमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू

चाकण, ता. १३ : शेलपिंपळगावच्या (ता.खेड) हद्दीत चाकण- शिक्रापूर मार्गांवरील शेलपिंपळगाव चौकात कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार बाळू बंडू थोरवे (वय ६०) याचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी जखमी झाली.
अपघातप्रकरणी आरोपी कंटेनर चालक अवधेश कुमार अरुण वर्मा (रा.मध्य प्रदेश) याला अटक केली आहे, अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलिस उपनिरीक्षक अमोल ढेरे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात गुरुवारी (ता.११) चारच्या सुमारास घडला. थोरवे हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरून शेलपिंपळगाव येथील चौकातून दौंडकरवाडीकडे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी शिक्रापूर बाजूकडून आलेल्या कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार बाळू थोरवे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात फिर्याद शिवाजी बंडू थोरवे (रा.शेलपिंपळगाव) यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com