गुन्हेगारीमुळे परिसरात अशांतता

गुन्हेगारीमुळे परिसरात अशांतता

चाकण, ता. २८ : येथील औद्योगिक वसाहतीतील चाकण, महाळुंगे परिसरात गुन्हेगारी वेगाने फोफावत आहे. खून, अपहरण असे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे परिसरात अशांतता निर्माण होत आहे.

महाळुंगे येथील रितेश पवार या तरुणाचा झालेला खून, गेल्या महिनाभरापूर्वी चाकण येथे झालेला अल्पवयीन मुलाचा खून, चाकणजवळील रासे फाट्या जवळील हॉटेल चालकावर झालेला गोळीबार, काही महिन्यांपूर्वी भोसेत झालेला तरुणावरील गोळीबार, महाळुंगे येथील खून प्रकरणातील बदला घेण्याच्या प्रकरणातून नुकतेच झालेले अठरा वर्षीय तरुणाचे महाळुंगे येथून झालेले अपहरण असे गुन्हे चाकण परिसरात वाढले आहेत. त्यातील काही गुन्हेगार जामीनावर सुटलेले आहेत. ते सराईतपणे अल्पवयीन मुलांच्या टोळ्या तयार करून दहशत माजवीत आहेत असेही वास्तव आहे. रासे फाट्यावरील हॉटेल चालकावर झालेला गोळीबार हा जे गुन्हेगार रेकॉर्डवर आहेत जे गुन्हेगार तडीपार आहेत त्यांच्यामधील वादातून झालेला आहे. तडीपार लोक सराईतपणे फिरत असल्याचे वास्तव आहे. याकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होते का? असा प्रश्‍नही नागरिक, कामगार, उद्योजकांचा आहे. पोलिसांची तपास यंत्रणा वेगाने फिरत असते, गुन्ह्यांचे तपास लावले जातात. पण गुन्हेगारी ही फक्त मलमपट्टी झाल्यासारखी रोखली जाते आणि पुन्हा वेगात पसरते असे चित्र आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीचा परिसर हा गुन्हेगारांसाठी ‘इझी मनी’ मिळविण्याचे महत्त्वाचे साधन आहे. बहुतेक गुन्हेगार खंडणी मागणे, हप्ता मागणे, ब्लॅकमेल करणे, काही लोकांवर दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी देणे त्यातून पैसा कमावणे. विविध कंपन्यात दादागिरी करणे त्यातूनही पैसा गोळा करणे. कंपन्यातील कामे, ठेकेदारी गुन्हेगारी करून मिळविणे त्यामुळे या परिसरात गुन्हेगारी फोफावते आहे.

चाकण, महाळुंगे परिसरातील काही गावात अशांतता निर्माण झालेली आहे. किरकोळ वाद झाला तर काही गुन्हेगार अगदी खुनाच्या घटनेपर्यंत जातात. किरकोळ वादावर काही खून झालेले आहेत आहेत. महाळुंगे गावात सातत्याने खुनाच्या घटना घडत असल्यामुळे गाव आर्थिक, औद्योगिक दृष्ट्या विकासाभिमुख असले तरी महाळुंगे गावातील काही प्रतिष्ठित मान्यवर आलिशान बंगले सोडून पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात राहण्यास गेलेली आहेत. त्यामुळे गावातील अशांतता किती भयानक आहे हे याचे चित्र आहे.

परिसरातील समस्या
- अल्पवयीन मुलांना अंमली पदार्थांचा विळखा.
- सराईतपणे तलवार, कोयते, गावठी कट्टे, पिस्तूल बाळगणे.
- सोशल मीडियावर धमक्या देणे.
- गुन्हा करतानाचे चित्रीकरण करत ते समाजमाध्यमांवर टाकणे.

चाकण परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस सातत्याने प्रयत्न करत आहेत. तडीपार, मोका आदी कारवाया केल्या आहेत. पोलिसांनी गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न केला आहे. गुन्हेगारांच्या अड्डयाची पाहणी करून गुन्हेगारी टोळ्या अल्पवयीन मुलांच्या टोळ्या संपविण्याचाही पोलिस प्रयत्न करतील.
राजेंद्रसिंह गौर, सहाय्यक पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com