चाकणला गाजराची २० टन आवक

चाकणला गाजराची २० टन आवक
Published on

चाकण, ता. १ : येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले बाजार आवारात रविवारी (ता. १) राजस्थानातून गाजराची सुमारे २० टन आवक झाली. गाजराला घाऊक बाजारात प्रति किलोला २५ रुपये भाव मिळाला.
मध्यप्रदेशातून हिरव्या वाटाण्याची सुमारे ५० टन आवक झाली. हिरव्या वाटाण्याला घाऊक बाजारात प्रति किलोला २० ते २५ रुपये भाव मिळाला. गुजरात, नागपुरातून हिरव्या काळ्या व पिवळ्या मिरचीची मिळून सुमारे ३० टन आवक झाली.
कांद्याची सुमारे साडेचार हजार क्विंटल आवक झाली. कांद्याला प्रति किलोला आठ ते १६ रुपये भाव मिळाला. कांद्याचे भाव स्थिर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेवग्याच्या शेंगांना रुपये प्रति किलो १०० रुपये बाजारभाव मिळत आहे.

फळभाज्यांचे भाव पुढीलप्रमाणे (प्रति किलो रुपयांमध्ये)
टोमॅटो (१५), कारली (२५ ते ५०), दोडका (४० ते ५०), भेंडी (२५ ते ३५), गवार (१००), कोबी (१२), फ्लॉवर (१५), वांगी (३०), हिरवी मिरची (६० ते ८०), दुधी भोपळा (३०), शेवगा (१२०), ढोबळी मिरची (६०), चवळी (३०), हिरवा वाटाणा (२५ ते ३०), काकडी (३५), गाजर (२०), आले (आद्रक) ३० ते ४०, वालवर (५०).

कोथिंबिरीचे ढीग विक्रीविना पडून
कोथिंबीर, मेथी, शेपू, पालकाच्या सुमारे दोन लाखावर जुड्यांची आवक झाली. मेथीच्या एका जुडीला ५ ते १०, कोथिंबिरीच्या एका जुडीला ५, शेपूच्या एका जुडीला ५, तर पालकाच्या एका जुडीला ५ रुपये बाजारभाव मिळाला. पालेभाज्यांचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. मेथी, कोथिंबिरीचे ढीग विक्री विना राहिल्याने मेथी कोथिंबीर अक्षरक्ष: मातीमोल झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com