गणेश पतसंस्थेच्या 
अध्यक्षपदी लांडगे

गणेश पतसंस्थेच्या अध्यक्षपदी लांडगे

चास, ता. १३ : वाडा (ता. खेड) येथील गणेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भगवान पोपट लांडगे यांची; तर उपाध्यक्षपदी बबनराव लक्ष्मण पावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पतसंस्थेने बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखत यावर्षीही निवडणूक बिनविरोध करत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूकही बिनविरोध केली. सर्व नवनिर्वाचीत सदस्यांनी व ग्रामस्थांनी एकमताने पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भगवान लांडगे यांची; तर उपाध्यक्षपदी बबनराव पावडे यांची निवड केली. यावेळी नवनिर्वाचीत सदस्य रघुनाथ सदाशिव लांडगे, पांडुरंग भिकाजी हुंडारे, विष्णू बबनराव गुंडाळ, अनिल दादाभाऊ केदारी, किरण शंकर हुंडारे, अक्षय सुनील केदारी, केरू किसन हुले, सुरेखा दत्तात्रेय बोऱ्हाडे, शीतल सोमनाथ देशमुख आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एम. धादवड; तर सहायक म्हणून सचिव हितेश प्रकाश रावळ यांनी काम पाहिले.

भगवान लांडगे
बबनराव पावडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com