गुंडाळवाडीमधील उत्सवात धावले ७०० बैलगाडे

गुंडाळवाडीमधील उत्सवात धावले ७०० बैलगाडे

चास, ता.३ : गुंडाळवाडी (ता. खेड) येथे शिवशंभो महाराज यांचा यात्रा उत्सव नुकताच पार पडला. उत्सवाचे आकर्षण ठरलेल्या बैलगाडा शर्यतींमध्ये फायनल शर्यतीत चास येथील मनोज चासकर यांनी प्रथम क्रमांक पटकविला. दुसऱ्या दिवशी प्रियांकाताई दत्तात्रेय राखुंडे तर तिसऱ्या दिवशी दत्तात्रेय भिकाजी बारवे यांच्या गाड्याने जिंकली तर घाटाच्या राजा बहुमान रघुनाथ लांडगे, वाडा येथील तान्हाजी कचाटे व शंभुराजे मित्र मंडळ यांच्या गाड्याने प्राप्त केले.

उत्सवाच्या तीन दिवसांत तब्बल ७०० बैलगाडे धावले. त्यामध्ये पहिल्या दिवशी प्रथम क्रमांक मनोज कैलास चासकर, व्दितीय क्रमांक सदाशिव राघू बच्चे, हेद्रुज यांच्या गाड्याने, तृतीय क्रमांक सुभाष शंकर घनवट, चास यांच्या गाड्याने प्राप्त केला. घाटाचा राजा बहुमान रघुनाथ लांडगे यांच्या गाड्याने मिळवला तर आकर्षक बारीचा बहुमान किरणशेठ झुरूंगे, हरण्या ग्रुप-नारायण विष्णू ठोंबरे, गंगाराम किसन कडलग यांच्या गाड्याने मिळवला. दुसऱ्या दिवशी झालेल्या शर्यतीत प्रथम क्रमांक प्रियांकाताई दत्तात्रेय राखुंडे, गुंडाळवाडी यांच्या गाड्याने, व्दितीय क्रमांक मारुती रामभाऊ एरंडे, कोल्हारवाडी यांच्या गाड्याने, तृतीय क्रमांक भिमाजी हौशिराम पितांबरे, कडूस यांच्या गाड्याने प्राप्त केला.
घाटाचा राजा बहुमान कानिफनाथ बैलगाडा संघटना तान्हाजी कचाटे यांच्या गाड्याने मिळवला तर आकर्षक बारीचा बहुमान प्रियांकाताई दत्तात्रय राखुंडे, महादेव श्रीपती बवले, कानिफनाथ बैलगाडा संघटना यांच्या गाड्याने प्राप्त केला. तिसऱ्या दिवशी झालेल्या शर्यतीत प्रथम क्रमांक दत्तात्रेय भिकाजी बारवे, चास-नारोडी यांच्या गाड्याने, व्दितीय क्रमांक संतोष मंगेश वाळुंज, तिफनवाडी यांच्या गाड्याने, तृतीय क्रमांक सचिन आनंद शिंदे यांच्या गाड्याने प्राप्त केला. घाटाचा राजा बहुमान शंभुराजे मित्र मंडळ, गुंडाळवाडी यांच्या गाड्याने मिळवला तर आकर्षक बारीचा बहुमान शंभुराजे मित्र मंडळ, गुंडाळवाडी, रोहन शंकर भवारी यांच्या गाड्याने प्राप्त केला.

बैलगाडा घाटाचे उद्‌घाटन बाजार समितीचे संचालक अनुराग जैद यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच फसाबाई चतूर, उपसरपंच सतीष जैद, दत्ता राखुंडे, मा. सरपंच अरुण अण्णा गुंडाळ, सुजाता भोर, संगीता तनपुरे, सुनील जैद, बाळासाहेब जैद, सुरेश जैद, महेश राखुंडे, बंडू भोसले, चंद्रकांत भोर, शिवाजी जैद, दत्ता राखुंडे, गणेश राखुंडे, विकास जैद, भानुदास जैद, शाखा प्रमुख लहू भोर, सागर भोर आदी उपस्थित होते.

00932

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com