फलकांवर कारवाई करताना 
दौंड नगरपालिकेचा दुजाभाव

फलकांवर कारवाई करताना दौंड नगरपालिकेचा दुजाभाव

दौंड, ता. १६ : राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या समर्थनार्थ दौंड शहरात लावण्यात आलेले विना परवानगी फलक काढण्यास दौंड नगरपालिका प्रशासन मध्यरात्री सरसावले होते. परंतु, प्रशासनाकडून शहरातील अनधिकृत फलकांवर कारवाई न करता दुजाभाव केला जात आहे.
खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार राहुल कुल हे अध्यक्ष असलेल्या दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील गैरकारभाराची चौकशी करण्याची लेखी मागणी केल्यानंतर दौंड तालुक्यातील राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपांनी तापलेले आहे. दौंड तालुक्यातील शेतकरी व भीमा पाटस कारखान्याच्या सभासदांकडून खासदार राऊत यांच्या आभाराचे विनापरवानगी फलक बुधवारी (ता. १५) छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यासह शहरात लावण्यात आले होते. सदर फलकांवर नगरपालिका प्रशासनाने सफाई कामगारांच्या मदतीने मध्यरात्री बारा वाजता कारवाई करीत हे फलक हटविले. विना परवानगी फलक काढल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे, परंतु कारवाई करताना दुजाभाव न करता सर्वच फलकांवर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दौंड नगरपालिका हद्दीत विविध चौक, रस्ते, वर्दळीची ठिकाणे, इमारती, आदी ठिकाणी दररोज विना परवानगी फलक लावले जातात. परंतु नगरपालिका प्रशासनाकडून फलक हटविले जात नाहीत. दौंड पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता असल्याने नगरपालिका प्रशासनाला अशा विना परवानगी फलकांवर सत्वर कारवाई करण्यासंबंधी पत्र दिले आहे. परंतु त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com