दौंड बाजारात गहू २७५१ रुपये क्विंटल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड बाजारात गहू २७५१ रुपये क्विंटल
दौंड बाजारात गहू २७५१ रुपये क्विंटल

दौंड बाजारात गहू २७५१ रुपये क्विंटल

sakal_logo
By

दौंड, ता. २२ : दौंड तालुक्यात गव्हाची एकूण १२७६ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल किमान २०५० रुपये; तर कमाल २७५१ रुपये बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात गव्हाची १०३० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल किमान २०५० रुपये; तर कमाल २६५१ रुपये बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक व बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात नवीन गव्हाची ७३८ क्विंटल आवक झाली आहे. केडगाव येथे कांद्याची ३२५० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ३०० रुपये; तर कमाल १२०० रुपये, असा बाजारभाव मिळाला. फ्लॉवरची ३९० गोणी आवक होऊन त्यास प्रतिगोणी किमान २०० रुपये; तर कमाल ४०० रुपये दर मिळाला. तालुक्यात लिंबाची ५२ डाग आवक झाली असून, प्रतवारीनुसार किमान ११०० व कमाल २५०० रुपये प्रति डाग, असा भाव मिळाला.
तालुक्यात कोथिंबिरीची २२ हजार ४५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १०० रुपये, तर कमाल ४०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. मेथीची ७६१० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० व कमाल ४०० रुपये, असा बाजारभाव मिळाला.

भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो- २००, वांगी- २००, दोडका- ४५०, भेंडी- ५००, कार्ली- ३५०, हिरवी मिरची- ५००, गवार- ११००, भोपळा- १००, काकडी- १७०, शिमला मिरची- ४५०, कोबी- ५०.

कलिंगड व खरबुजाची आवक वाढली
दौंड मुख्य बाजारात कलिंगडची ७८० क्रेट आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ५०; तर कमाल ७५ रुपये दर मिळाला. तर, खरबुजाची ६१० क्रेट आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोसाठी किमान १००; तर कमाल २०० रुपये दर मिळाला.